34
10

5
2
2

डॉ. दीपक रामचंद्र सावंत

– सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री (महाराष्ट्र)

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकिय क्षेत्रात अनेक वर्षे झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व…
मोठा मित्र परिवार विविध क्षेत्रातील मान्यवरांशी जवळचा संबंध…
समाजातील उच्च वर्गातील तसेच समाजातील आदिवासी, कातकरी समाजाशीही तेवढीच जवळीक…

जन्म मुंबईचाच, कार्यक्षेत्र मुंबईच पण कच्छपासून ते तामिळनाडू, केरळपर्यंत कुठेही काम करण्याची तयारी असणारा, मोखाड्यातील, मेळघाटातील, सातपुड्यातील आदिवासींचे प्रश्न समजून घेऊन ते विधानपरिषदेत तळमळीने मांडणारा, कुपोषणावर प्रत्येक अधिवेशनातील प्रत्येक आठवड्यात प्रश्न उपस्थित करुन गरीब, आदिवासी, मरणासन्न मुलांसाठी सतत दुर्गम भागात धाव घेणारा, आश्रम शाळेतील प्रचंड अनागोंदी कारभाराविषयी पोटतिडकीने प्रश्न मांडणारा, कुपोषणाविषयी शासनाला श्वेतपत्रिका काढण्यास मजबूर करणारा आमदार
विधानपरिषदेतील 12 वर्षे आमदार म्हणून कारकीर्द.
माननीय राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार प्राप्त.
मोखाड्यातील जनतेकडून ‘आदिवासी सेवक’ या पुरस्काराने सन्मानित
मुंबईतील ट्रॅफिक समस्या, शाळेच्या प्रवेशाविषयी, ऑनलाईन प्रवेशाविषयी, एस. एस. सी., आय. सी. एस्. ई., सी. बी. एस. ई. मुलांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी विविध आयुधातून प्रसंगी कोर्टातही लढा देणारा शिवसैनिक.

26 जुलैचा पूर असो, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, मेंदूज्वर या विविध साथींसाठी आरोग्यखात्याला जाण देणारा तसेच गडचिरोली ते मुंबईतील उपनगरांपर्यंत साथीच्या काळात धावणारा 26 जुलैच्या पावसानंतरची साथ असो की लोकलमधील बॉम्बस्फोट असो, की 26/11, जवेरीबाजारचा बॉम्बस्फोट सदैव जखमींना रुग्णांना मदतीचा हात देणारा, येणाऱ्या नैसर्गिक संकटांची म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यावर प्रथमच विधिमंडळाच्या सभागृहात शासनाला येणाऱ्या भीषणतेची जाणीव करून देणारी चर्चा उपस्थित करणारा जागृत आमदार.
वैद्यकीय, इंजिनियरिंगच्या प्रवेशाच्या प्रत्येक टप्प्यावर नजर ठेऊन MCI, AICTE च्या धोरणावर बारीक लक्ष ठेऊन उद्याचा तरुण हा सुविद्य कसा होईल, खाजगी विद्यापीठापासून साठमारी कशी कमी करता येईल याची जाणीव असलेला सुशिक्षित आमदार. डिप्लोमा होल्डर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना डिग्रीसाठी सीट्स वाढवून देण्यासाठी प्रयत्नशील.
केवळ वैद्यकीय क्षेत्रातील नाहीतर आपण इतरही क्षेत्रात शिक्षण घेतले पाहिजे म्हणून बी. ए., एम. ए., एम. फील., पीएच. डी. मिळवणारा आमदार. अनेक वर्षे रुग्णसेवा करुन मग राजकारणात प्रवेश करुन आज शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने व माननीय शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेणारा आमदार.
अजूनही खूप आहे… सांगण्यासारखे!

सामाजिक – शैक्षणिक – आरोग्यविषयक नानाविविध समस्यांचे गुणात्मक निराकरण करणारा, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा, पदवीधरांच्या आशा-आकांक्षांना आकार देणारा, गरजूंसाठी धाव घेणारा, सुविद्य, सेवाभावी, जागरुक, सर्वसमावेशक, अष्टपैलू लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. दीपक सावंत हे उजवे ठरतात…

चलचित्र

संपर्क

कार्यालय : पाचवा मजला, मंत्रालय मुख्य ईमारत, नरीमन पॉईंट, मुंबई – ४०० ०३२

संपर्क क्र. : ०२२-२२०२३९९२, २२०२२१००

ई – मेल : contact@deepaksawant.com

Back to Top
Contact