• shivsena
  शिवसेना
 • telemedicine
  टेलिमेडीसीन
 • antispitting
  थुंकी प्रतिबंधक
 • ophthalmic
  नेत्रतपासणी
 • bloodtransmission
  रक्त घटक
 • femalehealth
  महिला आरोग्य
 • balmrutyu2
  बाल मृत्यू
 • aabyaskram
  पदव्युत्तर अभ्यासक्रम
 • bikeambulance
  बाईक अॅम्ब्युलन्स
 • ads
  एड्स
 • stethoscope
  आरोग्य शिबीरे
 • mansikaarogya
  मानसिक आरोग्य
 • tb
  टि. बी. बाबत जनजागृती अभियान
 • nivrutti
  सेवानिवृत्ती
 • kumbhmela
  रोगराईंवर उपाययोजना
 • h1n1
  स्वाईन फ्ल्यू
 • hmonline
  हेल्थ मिनिस्टर
 • community
  कम्यूनिटी रेडिओ
 • nursing-icon
  नर्सिंग स्कूल
 • kayapalat
  ऑपरेशन कायापालट
 • gunavatta
  गुणवत्ता हमी
 • rajivgandhiyojana
  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
 • panel
  नविन डॉक्टरांची नियुक्‍ती
 • balarogya
  बाल आरोग्य
 • 108symbol
  १०८ सेवा
 • rashtriyaswastha
  जननी सुरक्षा व राष्ट्रीय स्वास्थ
 • workshop
  कार्यशाळा
 • niyukti
  पदभरतीस मान्यता
 • dialysis
  डायलेसिस व सिटीस्कॅन
 • vaccine
  पेन्टाव्हॅलन्ट
 • palakmantripart
  पालकमंत्री

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

3thakre

महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून शिवसेनेच्या जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या उद्देशाने पहिल्या वर्षात घेतलेले ठळक निर्णय व त्यातून महाराष्ट्र राज्यातील जनतेस अपेक्षित आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयाचा समावेश वर्षपूर्तीच्या कार्य अहवालाच्या रुपात जनतेपुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

टेलिमेडीसीन प्रकल्प (शिव आरोग्य सेवा)

02

 • टेलिमेडीसीन प्रकल्पाचा प्रारंभ दि. १ फेब्रुवारी, २०१५ रोजी करण्यात आला.
 • राज्यातील दुर्गम भागातील, जसे मेळघाट या अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ’व्ही-सॅट’ या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मुंबईमधील तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सदर प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे.


01

 • राज्यातील जसे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगांव, पालघर जिल्ह्यातील वाडर, मोखाडा व जव्हार आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा या भागामध्ये सदर सेवा लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
 • सध्या मेळघाटातील रुग्णांना नेत्र, त्वचा, जनरल मेडीसीन, हृदयरोग इत्यादी सेवा पुरविण्यात येत आहेत. रुग्णांना सेकंड ओपिनियन तसेच शहरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा टेलिमेडीसीनद्वारे उपलब्ध होत आहेत.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

महाराष्ट्र आरोग्य रक्षण व थुंकी प्रतिबंधक अधिनियम प्रस्तावित

do-not-spit

 • सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रतिबंध करणे.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. १००० व १ दिवस सार्वजनिक रुग्णालयात सामाजिक सेवा देण्याची शिक्षा प्रस्तावित.
 • दुसऱ्यांदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा थुंकल्यास रु. ३००० ते रु. ५००० व ३ दिवस सार्वजनिक रुग्णालयात सामाजिक सेवा देण्याची शिक्षा प्रस्तावित
 • याबबत फेसबुक व ईमेलद्वारे जनतेकडून प्राप्त झालेल्या सुचनांचा समावेश अधिनियम तयार करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

नेत्रतपासणी अभियान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

eye-check-up

 • राज्यात दि. २३ जानेवारी, २०१५ ते ३० जानेवारी, २०१५ या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी शिबीर व ५००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
 • परंतु या कार्यक्रमात सर्व जिल्ह्यात वरील उद्दिष्ट ओलांडून १५१८९ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या व त्यांना दृष्टि मिळाली तसेच ५६,८८४ व्यक्तींनी नेत्रतपासणीचा लाभ घेतला.
 • महिला दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी, २०१५ ते १२ मार्च, २०१५ या कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरामध्ये एकूण ६८४०६ स्त्री रुग्णांची तपासणी करण्यात आली व ४६७२ महिला रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

रक्त घटक व रक्त संक्रमण

blood-bag

 • राज्यातील रक्ताचे जास्त दर पहाता सर्वप्रथम राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना रक्त परवडणाऱ्या दरात उपलब्ध करुन द्यावे म्हणून रक्ताच्या पिशवीचे दर रु. १०५० वरुन रु. ८५० पर्यंत कमी करण्यात आले.
 • रक्त संक्रमणामुळे पसरणाऱ्या आजारांची, जसे एड्स, काविळ इत्यादी आजारांची जोखीम कमी करण्यासाठी आधुनिक न्यूक्लिक अ‍ॅसिड टेस्ट (नॅट) ही प्रणाली विभागीय स्तरावर असलेल्या शासकीय रुग्णालयातील रक्त पेढ्यांमध्ये सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

महिला आरोग्य अभियान

mahila-arogya

 • दि. २६ फेब्रुवारी, २०१५ ते दि. १० एप्रिल, २०१५ या कालावधीत महिला आरोग्य अभियान राबविण्यात आले.
 • अभियानात महिलांकरीता खास करुन जोखमीच्या गरोदर महिलांकरीता रक्तक्षय तपासणी शिबिरे घेण्यात आली.
 • आई व बाळाला सुखरुप घरी सोडण्याकरीता ’वात्सल्य’ नावाने २९ ठिकाणी रुग्णवाहिकेची सुविधा सुरु करण्यात आली. या रुग्णवाहिकेतच आईला आरोग्यविषयक शिक्षण, पोषण आहार व बाळाचे संगोपन या विषयीची माहिती देण्यात येते.
 • याशिवाय सुरक्षित मातृत्व साध्य करण्यासाठी जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना व मानव विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून लाभार्थ्यांना तात्काळ लाभ अदा करण्यात येत आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

मेळघाटातील माता व बाल मृत्यू रोखण्यासाठीचे केलेले प्रयत्न

melghat-mata-v-bal-mrutyu

 • मेळघाटात गरोदर मातेची ट्रॅकिंग करण्यात येत असून मागील ६ महिन्यात माता मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.
 • मेळघाटसाठी स्पेशल नोडल ऑफीसर म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे.
 • ज्या भागात कनेक्टीव्हीटी नाही तेथे ट्रॅकिंगप्रमाणे रुग्णवाहिकेद्वारे ठराविक दिवशी मातेस जवळच्या प्राथमिक केंद्रामधे आणण्यात येते व तपासणी केली जाते.
 • आवश्यकता असल्यास तेथे सोनोग्राफी, रक्‍त तपासणी केली जाते.  लोहाची कमतरता असल्यास गोळ्या व औषध पुरविणे, गरोदर मातेची बाळंतपणाची संभाव्य तारीख ठरवून आवश्यक त्या सर्व तपासण्या करुन औषधोपचार केला जातो.
 • मदतीसाठी ’आशा’ सेविका उपलब्ध आहेत.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

पदव्युत्तर अभ्यासक्रम

postgraduate-studies

 • सार्वजनिक आरोग्य विभागातील विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता पाहता राज्यातील जिल्हा रुग्णालयात कॉलेज ऑफ फिजीशियन ऍण्ड सर्जन (सी. पी. एस.) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • यामध्ये एकूण ३१२ विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल.
 • या अभ्यासक्रमात ६०% खाजगी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. या विद्यार्थ्यांनी सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी किमान ५ वर्ष राज्यातील आरोग्य सेवा पुरविणे बंधनकारक राहील.
 • यामुळे ग्रामीण भागात देखील विशेषज्ञ सेवा पूरविता येतील.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

बाईक अॅम्ब्युलन्सची चाचणी

bike-ambulance

 • शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांचे हस्ते मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचे अनावरण दिनांक ०३ नोव्हेंबर, २०१५ रोजी झाले. मुंबई सारख्या मोठ्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी जेथे अॅम्ब्युलन्स पोहचू शकत नाही, त्याभागात मोटार बाईक अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णांना वेळेवर उपचार होण्यास मदत होणार आहे. पुढील तीन महिन्यात बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा इंग्लंडच्या धर्तीवर सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे.


bikeambulance3 bikeambulance4 bikeambulance1

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

एड्स ग्रस्तांचे समुपदेशन

aids

 • मुंबईतील कामाठीपूरा भागातील वेश्यावस्तीत जाऊन जनजागृती अभियान म्हणून तेथील एड्स ग्रस्त नागरीकांच्या आरोग्यविषयक समस्येबाबत रक्षाबंधनाच्या दिवशी समुपदेशन कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

विशेषज्ञांची आरोग्य शिबीरे

visheshdynamchi-arogya-shibire

 • पंचतारांकित रुग्णालयातील विशेषज्ञांमार्फत ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत.
 • दि. १२ मे ते १४ मे २०१५ या कालावधीत देवगड येथे खाजगी दंत विशेषज्ञ व अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांचे कॅम्प घेण्यात आले. यामधे दंत कॅम्प मध्ये ३७१ रुग्ण तपासण्यात आले व त्यात ५१६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर, अस्थिव्यंग कॅम्प मध्ये १३५ रुग्ण व ९३ शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.

arogyashibire

 • अशाच प्रकारे विविध जिल्ह्यात विविध आजारांवर पंचतारांकित रुग्णालयांच्या मदतीने विशेषज्ञांची सेवा देण्याचे प्रस्तावित आहे.
 • पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा व खोडाळा तसेच मुंबई येथील विविध उपनगरामध्ये विशेषज्ञांची आरोग्य शिबीरे घेण्यात आली.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

मानसिक आरोग्य

शेतकरी आत्महत्या

 • वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक व सेविका (ए‍एन‍एम), गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण
 • ए एन एम ची तज्ञ मानसशास्त्रज्ञांद्वारे प्रशिक्षण

samupadeshan1

 • प्रशिक्षीत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांचे समुपदेशन
 • आरोग्यसेवक व आशा स्वयंसेविका शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमधील शेतकऱ्यास ती योग्य समुपदेशन करुन तज्ञ डॉक्टरांकडे संदर्भित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक व आशा सेवक सेविका मानसिक आजाराच्या १०४ मानसिक आरोग्य हेल्पलाईनद्वारे आजाराच्य स्तराप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय उप जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय स्तरावर संदर्भ सेवा उपलब्ध

samupadeshan2

 • धाराशीव (उस्मानाबाद) व यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे.
 • याशिवाय २६ फेब्रुवारी पासून राज्यात फोन क्र. १०४ वर ’मनोबल’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.


manasik-kishorvayin-mule

किशोरवयीन मुलांचे समुपदेशन

 • राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत युवतींकरीता हेल्प लाइन १८००२३३२६८८ सुरु करण्यात आली असून त्यात आत्तापर्यंत ५९२८ कॉल करण्यात आले आहेत.
 • पौगंडावस्थेतील मुला मुलींच्या शारीरीक व मानसिक समस्यांचे तज्ञांद्वारे निराकरण

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

टि. बी. बाबत जनजागृती अभियान

TB

 • डिसेंबर, २०१४ मध्ये टि. बी. विरुद्ध जनजागृती अभियान मा. उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले. या अभियानाकरीता श्री. अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

डॉक्टरांचे सेवानिवृत्ती वय वाढविणे

old-age-doctors

 • राज्यातील जन सामान्यास सार्वजनिक आरोग्य विभागातून आरोग्य व वैद्यकीय सेवा सुलभरित्या पुरविणे शक्य व्हावे व शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासू नये या दृष्टिकोनातून दि. ३१ मे, २०१५ पासून आरोग्य सेवा संचालनालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट – अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट – अ मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन ६० वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

नाशिक येथील कुंभमेळ्या दरम्यान रोगराईवर नियंत्रणासाठी उपाययोजना

nashik-kumbhmela

 • कुंभमेळ्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने हॉवर्ड विद्यापीठ, अमेरिका (युएसए) च्या सहकार्याने रिअल टाईम डिसिज सर्व्हेयलन्स सिस्टीम राबविण्यात आली. त्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान रोगांची वेळेवर माहिती मिळणे व त्यावर तात्काळ उपाययोजना करणे सोपे झाले. ही संपुर्ण प्रक्रिया अत्याधुनिक टॅबद्वारे नियंत्रित करण्यात आली.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

स्वाईन फ्ल्यू

swine-flu

 • राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आले आहेत.
 • तसेच या आजारात होणारा मोठा खर्च पाहता दि. २ मार्च, २०१५ पासून पुढे व्हेंटिलेटर वरील दारिद्र्यरेषेखालील सर्व रुग्णांच्या रुग्णालयीन खर्चाची प्रतिपुर्ती करण्यास शासन निर्णय दि. २०.३.२०१५ अन्वये मंजूरी दिलेली आहे. याकरीता मुख्यमंत्री सहायता निधीतून रु. ३ कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
 • या साथीनंतर संपूर्ण राज्यासाठी साथीचे आजार रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन तसेच महाराष्ट्र आपत्कालीन सेवा अधिनियम व महाराष्ट्र पब्लिक हेल्थ ऍक्टचे प्रारुप तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.
 • स्वाईन फ्ल्यूची साथ रोखणे व औषधोपचार मिळणेसाठी खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 • स्वाईन फ्ल्यूच्या काळात विभागाकडून विशेषत: मुंबई, पुणे, नाशिक, संभाजी नगर (औरंगाबाद) व धाराशिव (उस्मानाबाद), भंडारा व नागपूर येथे पाहणी करुन स्थानिक खाजगी रुग्णालय व सार्वजनिक रुग्णालयांना भेटी देण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
 • स्वाईन फ्ल्यूची लस व गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

हेल्थ मिनिस्टर ऑनलाईन

helth-minister-ol

 • सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत हेल्थ मिनिस्टर ऑनलाईन हि स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली असुन याद्वारे विभागातील कर्मचारी तसेच सामान्य जनता देखील आरोग्य मंत्र्यांकडे थेट वैद्यकीय सेवे संबंधातील तक्रारी / सूचना मांडू शकतील. त्यानुसार आरोग्य सेवेत सुधारणा होण्यास मदत होईल.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

कम्यूनिटी रेडिओ

community-radio

 • आकाशवाणी जनसंवादाचे प्रभावी माध्यम असल्याने कम्यूनिटी रेडिओ या माध्यमातून आरोग्य संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प निश्चित करुन आरोग्य संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील १७ कम्यूनिटी रेडिओ मार्फत ९ जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे.
 • आरोग्य संदर्भातिल जनजागृती हा मुख्य उद्देश कम्यूनिटी रेडिओ सुरु करण्यामागचा आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

जिल्हा रुग्णालय, ठाणे येथील नर्सिंग स्कूलचे नामकरण

thane-nursing-school

 • कै. अरुणा शानभाग अधिपरिचारीका, यांना के. ई. एम. रुग्णालयातील परिचारीकांनी दिलेल्या शुश्रुषा सेवा लक्षात घेता त्यांना आदरांजली म्हणून आरोग्य विभागाच्या ठाणे येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय, ठाणे येथिल नर्सिंग स्कुलचे “कै. अरुणा रामचंद्र शानभाग जी. एन. एम. नर्सिंग स्कुल, विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय, ठाणे” असे नामकरण करण्यात आले.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

ऑपरेशन कायापालट

operation-kayapalat

 • राज्यातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज व लोकाभिमुख करण्यासाठी कायापालट योजना संपुर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. कायापा-२०१४/प्र.क्र.१९९/आरोग्य-३ दि.०३.०९.२०१४ अन्वये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • लोक / कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे, जनतेचा शासकीय आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे, शासकीय आरोग्य संस्था मधून देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. उद्दिष्टे आहेत.
 • केंद्र शासनाने या योजनेची स्तुती केली असून ही बाब राज्य शासनासाठी अभिमानास्पद आहे. केंद्र शासनानेही कायाकल्प योजना या आधारे सुरु केली आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

गुणवत्ता हमी कार्यक्रम

gunavatta-hami

 • शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी गुणवत्ता हमी कार्यक्रम दि. १ मे, २०१५ पासून सुरु करण्यात आला आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

rajiv-gandhi-jeevendayee

 • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमार्फत दारिद्र्या रेषेखालील पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबे ज्यांचे वार्षीक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे अशा २ कोटी २० लक्ष इतक्या लोकसंख्येस उपयोग होत आहे.
 • दि. २९.०९.२०१५ पर्यंत ६,१४,५७६ इतक्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
 • केंद्र असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय स्वास्थ योजना सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये ३.५८ कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळेल.
 • राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या पुढील टप्प्यात नविन आजाराचा व शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार असून योजना नविन स्वरुपात सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

बाल आरोग्य अभियान

bal-arogya-abhiyan

 • राज्यातील बाल मृत्यू, अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता ७ एप्रिल, २०१५ ते १ मे, २०१५ पर्यंत बाल‌आरोग्य अभियान राबविले.
 • बालकांचे आरोग्य सुधारणे व गरजू बालकांना संदर्भसेवा उपलब्ध करुन देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
 • बालमृत्यू रोखण्यासाठी विविध कार्यक्रम व शिबिरे घेण्यात आली. यामध्ये बालकांचे आरोग्य, लसीकरण व संदर्भसेवा यांच्यावर भर देण्यात आला.
 • या कार्यक्रमाकरीता एकात्मीक बाल विकास प्रकल्प, शिक्षण विभाग, राजमाता जिजाऊ मिशन यांना समाविष्ट करण्यात आले होते.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

१०८ सेवा

108-seva

 • रुग्णांना तात्काळ सेवा पुरविण्यासाठी १०८ सेवा उपलब्ध केलेली आहे.
 • दि. २६.११.२०१५ पर्यंत ५ लाख ४८ हजार ३०० केसेस हाताळण्यात आल्या आहेत.
 • योजनेत ९३७ रुग्णवाहिका असून लोकसंख्या व आवश्यकता तपासून त्यातील काही रुग्णवाहिकांचे स्थानांतरण योग्य ठिकाणी करण्यात येत आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

जननी सुरक्षा व राष्ट्रीय स्वास्थ कार्यक्रम

janani-suraksha

 • सुरक्षित मातृत्व साध्य करण्यासाठी जननी सुरक्षा कार्यक्रम, जननीशिशू सुरक्षा योजना व मानव विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून लाभार्थ्यांना तात्काळ लाभ अदा करण्यात येत आहे.
 • पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या शारीरिक व मानसिक समस्यांचे तज्ञांद्वारे निराकरण करण्यात येते.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा, सी. एम. ई.

cme

 • जंतू संसर्ग होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व नेत्र शल्य चिकित्सकांना नेत्र शस्त्रक्रिया करण्याअगोदर व केल्यानंतर कोणत्याप्रकारे खबरदारी घ्यावी याबाबत जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेच्या अनुषंगाने नेत्र शल्य चिकित्सकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार करुन वितरीत करण्यात आली.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

रुग्णालयांमध्ये नवीन पदभरतीस मान्यता

hospital-vacancy

 • मा. मुख्यमंत्री यांचेकडे केलेल्या सातत्याने पाठपुराव्यामुळे एकुण रिक्‍त पदांच्या ७५ टक्के पदे पदभरतीस मान्यता प्राप्त. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी तसेच वर्ग ३ व वर्ग ४ ची एकुण १०८५५ आरोग्य विभागांतर्गत पदभरती होणार असून यामुळे रुग्ण सेवा सुरळीतपणे देणे शक्य होणार आहे.
वैद्यकीय अधिकारी ११५२
गट क ५३०६
गट ड २७८९
राज्य कामगार विमा योजना २३१७
 • विभागातील रुग्णालयामधील वर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची पदभरती नजीकच्या काळात करता येईल.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

राज्यातील जिल्हा / उपजिल्हा रुग्णालयांत डायलेसिस व सिटीस्कॅन

dialysis-&-ct-scan

 • श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) यांचेकडून मा. मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या पाठपुराव्यामुळे ३४ जिल्हा / उपजिल्हा रुग्णालयांत १०२ डयलेसिस युनिट उभारणी व आर. ओ. प्लॅन्ट उभारणी करीता रु. ७.५० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त झाले.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

पेन्टाव्हॅलन्ट लसीकरणाची सुरुवात

pentavalent

 • दि. २२.११.२०१५ रोजी उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे पेन्टाव्हॅलन्ट लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये लहान बालकांना पाच गंभीर आजारापासून बचावासाठी एकच लस पेंटाव्हॅलन्ट नावाने उपलब्ध केलेली आहे. यामुळे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटीस बी (कावीळ) आणि हिब या पाच प्राणघातक रोगांपासून लहान बालकांचे संरक्षण होणार आहे.

Dr. Deepak Sawant, Health Minister 2020

पालकमंत्री म्हणून केलेल्या कामाचा कार्य अहवाल

उस्मानाबाद

अ.क्र.दिनांकविषयदिलेले आदेश
1२५ व २६ जानेवारी, २०१५प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास उपस्थिती१) सरमकुंडी ता. वाशी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सांत्वन भेट
२) प्राथमिक आरोग्य केंद्र पारगाव येथे भेट व पाहणी
३) टंचाई आढावा बैठक
४) हमारा जल हमारा जीवन अभियान कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती
५) जलयुक्त शिवार अभियान पाहणी
2१० फेब्रुवारी, २०१५जिल्हा नियोजन समिती २०१४-२०१५१) पुर्वनियोजनास मान्यता
२) टंचाई आढावा बैठक
3९ मे, २०१५टंचाई आढावा बैठक१) पीक कर्ज वाटप विषयक सूचना
२) जलयुक्त शिवार अभियान पाहणी-भोसगा ता. लोहारा
4१२ जून, २०१५उमरगा तालुका दौरा१) नगरपरिषद उमरगा-जलशुद्धीकरण केंद्र उदघाटन
२) कृषी उत्पन्न बाजार समिती-इमारत उदघाटन
३) जळकोट तालुका तुळजापूर पशुवैद्यकीय दवाखाना इमारत उदघाटन
5१८ जूलै, २०१५टंचाई आढावा बैठक१) पिण्याच्या पाण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या टँकर्सच्या संख्येचा आढावा
२) पिण्याचे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
३) पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
४) पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे पैसे कापण्यात येऊ नयेत याबाबत आदेश दिले
५) रोजगार हमी योजनेंतर्गत मंडळनिहाय कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
६) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
6७ ऑगस्ट, २०१५टंचाई आढावा बैठक१) विहीर अधिग्रहणाचे पैसे तातडीने देण्यात यावेत.
२) चारा छावण्या तातडीने सुरु करण्यात याव्यात
३) प्रत्येक गावात रोहयो अंतर्गत किमान ५ कामे सुरु करण्याबाबत तहसिलदारांना आदेश देण्यात आले आहेत.
४) पाण्याचे सर्व स्त्रोत आरोग्य विभागाकडून तपासून घेण्यात यावेत.
५) बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेले शिधापत्रिकांचे वाटप तात्काळ सुरु करण्यात यावेत तसेच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मागेल त्याला कार्डाचे वाटप करण्याची कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले
६) तालमवाडी या टंचाईग्रस्त गावास भेट
७) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
7२१ व २२ ऑगस्ट, २०१५जिल्हा नियोजन समिती २०१५-२०१६१) सन २०१५-२०१६ च्या जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यास मान्यता देण्यात आली तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीवर करावयाच्या उपाय योजनांबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात आले.
२) स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, डेंग्यु इ. आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याबाबत उपसंचालक लातूर व जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
३) वडगाव (सिद्धेश्वर) व म्हाळुंब्रा या टंचाईग्रस्त गावाची पाहणी
४) सीना-कोळेगाव येथील धरणाची पाहणी
५) खासगाव ता. परांडा व वालवड ता. भूम येथे भेट व गावात पिण्याच्या पाण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या टँकरची पाहणी व आढावा
६) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
8१ व २ सप्टेंबर, २०१५दुष्काळ पाहणी दौरा१) कळंब तालुक्यातील जलयुक्त शिवाराची पाहणी
२) ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व मांजरा धरणास भेट व पहाणी
३) उस्मानाबाद येथे शेतकरी मेळावा, शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याबाबत मार्गदर्शन
४) शिवसेना पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यातील १२५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १०,०००/- रुपयांची मदत
५) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
9१३ व १४ सप्टेंबर, २०१५मा. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा१) मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत चारा छावण्यांचे उदघाटन
२) शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व समोपदेशन
३) सिनी-कोळेगाव धरणास भेट
४) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
10१२ ऑक्टोबर, २०१५नवरात्रौत्सव पूर्वतयारी१) तुळजापूर येथील नवरात्रौत्सवानिमित्त पूर्वतयारीसाठी आढावा बैठक
२) रस्त्यांची आढावा बैठक
३) नवरात्रौत्सवानिमित्त सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा व पहाणी
11२२ नोव्हेंबर, २०१५शेतकरी मेळावा१) पेंटाव्हॅलेंट लसीचे राज्यस्तरीय अनावरण
२) आशा कार्यकर्त्यांचा मेळावा व मार्गदर्शन
३) शेतकऱ्यांच्या आरोग्य शिबिराचे उदघाटन व मार्गदर्शन
४) जिल्हा शल्यचिकित्सक / जिल्हा आरोग्य अधिकारी / सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक
५) दलित वस्ती सुधार कार्यक्रमाबाबत आढावा बैठक
६) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक
12२८ व २९ नोव्हेंबर, २०१५आमदार व लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक१) तालुकानिहाय दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा
२) शिवसेना व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमार्फत प्रत्येक तालुक्याची भेट घेऊन तेथील दुष्काळ व विकास कामांचा आढावा
३) चारा छावण्या व पाणीटंचाई तसेच जलयुक्त शिवार अंमलबजावणी आढावा
४) दुष्काळ परिस्थिती व पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठक

भंडारा

अ.क्र.दिनांकविषयदिलेले आदेश
1८ जानेवारी, २०१५जिल्हा नोयोजन समिती बैठक सन २०१४-२०१५जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाच्या बैठकीस उपस्थिती
2८ फेब्रुवारी, २०१५जिल्हा नियोजन समिती बैठक सन २०१४-२०१५जिल्हा वार्षिक योजना २०१४-२०१५ च्या पुर्वनियोजनास मान्यता देण्यात आली.
3६ मे, २०१५खरीप आढावा बैठक१) खताचे लिकिंग बंद व्हावे अन्यथा वितरकांवर फौजदारी कारवाई करावी.
२) जिल्ह्यातील सर्व धान केंद्र सुरु करण्यात यावीत
३) महवितरण कडून करण्यात येणारे भारनियमन बंद व्हावे.
४) कृषि विमा योजनांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा.
५) जलयुक्त शिवार अंतर्गत घेतलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
4२ जून, २०१५जिल्हा नियोजन समिती बैठक सन २०१४-२०१५१) सन २०१५-२०१६ मधील जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक व सन २०१५-२०१६ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजूरी
२) पवनी नगरपरिषदेस भेट व कामकाज विषयक आढावा
5१४ व १५ ऑगस्ट, २०१५स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती१) महिला रुग्णालयासाठी जागा तात्काळ उपलब्ध होण्याबाबत व इतर महसूल विषयक प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
२) जिल्हा रुग्णालयासाठी सी.टी.स्कॅन मशिन खरेदीबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याबाबत उपसंचालक आरोग्य सेवा यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
३) जलजन्य, वायुजन्य व स्वाईन फ्ल्यू विषयक आजारासंदर्भातील उपाय योजनांसंदर्भात सद्यःस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला आहे.
४) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस अधिक्षक यांना निर्देश देण्यात आले आहेत.
५) जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत नवजात अर्भक विभागाचे उदघाटन करण्यात आले.
६) सिरसी येथे जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जलपूजन व निर्माण झालेल्या तलावाची पाहणी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती
6५ नोव्हेंबर, २०१५उदघाटन व आढावा बैठक१) नियोजन भवनचा भुमिपुजन समारंभ
२) सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती पुस्तिकेचे विमोचन
३) सावकारी कर्ज माफी-मंगळसूत्र वापसी कार्यक्रम
४) जिल्हा नियोजन समितिची बैठक
५) वरठी पोलीस स्टेशनचे उदघाटन
६) करडी पोलीस स्टेशनचे उदघाटन
7नागपूर अधिवेशनादरम्यान१) भंडारा येथे सांस्कृतिक भवन व अद्यावत ग्रंथालय निर्मान करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे
२) भंडारा येथे जिल्हा विकास निधीमधून सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देणे
३) भंडारा येथे नवजात बालकचे काळजी कक्ष निर्माण करणे
४) भंडारा येथे महिला रुग्णालय निर्माण करणे